शिवसेनेला सत्तेतून हाकला-नारायण राणे

0
4

मुंबई- ‘गोध्राकांड आणि अहमदाबाद दंगलीमुळे नरेंद्र मोदी यांची जगात ओळख आहे, असे विधान शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केले आहे. त्याबाबत भाजपने अद्यापही खुलासा केलेला नाही. संजय राऊत यांनी केलेले हे विधान भाजपला मान्य आहे, असे मानायचे काय? आणि ते जर मान्य नसेल तर आमच्या पंतप्रधानांची जगभरात अशी प्रतिमा निर्माण करणा-या शिवसेनेला भाजपने तत्काळ सत्तेतून हाकलून द्यावे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री नारायण राणे यांनी करीत गुरुवारी शिवसेना-भाजपाची कोंडी केली.
राज्यात वाढलेली महागाई, शिवसेना- भाजपमध्ये सुरू असलेले राजकारण, इंदू मिलचे उरकलेले उद्घाटन आणि शेतमालाची आधारभूत किंमत वाढविण्यात सरकारने केलेली कुचराई या विषयांवर नारायण राणे यांनी मंत्रालयासमोरील गांधी भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, आमदार हरिभाऊ राठोड हेही उपस्थित होते.
शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेल्या राजकारणावर टीका करताना नारायण राणे म्हणाले की, राज्यात दुष्काळ आहे, महागाईने जनता बेजार आहे आणि अशा वेळी सत्तेत असलेले दोन पक्ष एकमेकांवर टीका करण्यात गुंतले आहेत. एकत्र सत्ता भोगणारे हे दोन पक्ष एकमेकांना सत्तेच्या बाहेर पडण्याचे सल्ले देत आहेत. सत्तेसाठी किती लाचार व्हावे, किती अपमान सहन करावा याची परिसीमा शिवसेनेने गाठली आहे.
मुंबईमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे उद्घाटन होत असताना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना निमंत्रण दिले जात नाही. आपले अस्तित्व दाखविण्यासाठी सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाईफेक केली जाते. तो कार्यक्रम रोखण्याची साधी धमकही आता शिवसेनेत उरली नाही. हे दोन्ही पक्ष एकमेकांवर पातळी सोडून टीका करीत आहेत.
शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेले विधान तर अत्यंत गंभीर आहे.त्यामुळे या भाजपने त्याबाबत गंभीरपणे विचार करून करणे गरजेचे आहे, असेही राणे म्हणाले.