नगराच्या विकासाकरीता भाजपाला मतदान करा – अग्रवाल

0
12

देवरी येथील निवडणूक प्रचार सभा
गोंदिया, दि.२८ : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जनकल्याणकारी योजना व निर्णयांच्या माध्यमातून विकासाचे कार्य सुरू आहे. शेतकरी, युवक, महिला व सर्वसामान्य नागरिकांकरीता सरकार काम करीत आहे. क्षेत्राच्या विकास करण्याकरीता सक्षम हातांमध्ये त्याची कमान देणे गरजेचे आहे. देवरी नगर पंचायतच्या सर्वांगीण विकासाकरीता भाजपा एकमात्र पर्याय असून भाजपच्या उमेदवारांना पूर्ण बहुमताने विजयी करून विकासाची संधी द्यावी, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.
देवरी येथील नगर पंचायत निवडणुकीच्या वॉर्डातील प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने आमदार संजय पुराम, जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, तालुका अध्यक्ष प्रमोद संगीडवार, पं. स. सभापती देवकी मरई, माजी सभापती सविता पुराम, जि. प. सदस्य अल्ताफ हमीद, सुखचंद राउत व उमेदवार विजय गहाणे, प्रविण दहीकर, अनिल अग्रवाल, कौशल्या कुंभरे, कांता भेलावे, सरिता डुंभरे, गुरqवदर भाटीया, सरिता चांदेवार, इंदरजितqसह भाटीया, विलास शिंदे, कोकीळा दखने, संजय उईके, भूमिता बागडे, सुनिता जांभुळकर, कृष्णदास चोपकर, संतोष तिवारी, नूतन सयाम उपस्थित होते.