कोजगिरीत विट्ठल नामाची शाला

0
21

गोंदिया—
कोजागिरी स्नेहमिलन कार्यक्रमात विट्ठल नामची शाला भरली असा सुखद अनुभव उपस्थितांनी घेतला. विदर्भ साहित्य संघ गोंदिया द्वारा श्री पद्मनारायण बापट लॉन येथे 27 ऑक्टोबर रोजी रात्री 8वाजता भजन गायनाचे आयोजन करण्यात आले होते.
मा नर्मदा भजन मंडळाचे रामू ढोरे, विजेंद्र राठौड़, अजय यादव, संतोष भैया, संतोष रामटेके, पप्पू वनवे, आणि त्रिलोक नेवारे या गायक-वादक कलवंतांनी विठ्ठल नामाची शाला भरली,राधा ही बावरी हरीची, तू काला होकर भी जगसे निराला क्यों, पंखिडा…आदि अनेक भजने सादर केली. तर सुप्रसिद्ध बसरी वादक विजेंद्र राठोड यांच्या बासरीने भजनांना आणखी सुश्राव्य केले.
प्रारंभी सहसचिव संजय निसल आणि कोषाध्यक्ष प्रकाश उमालकर यांनी सर्व कलवंतांचे पुष्पगुछाने स्वागत केले. तर मध्यांतरात शास्त्रीय भजन गायनाचे चाहते ज्येष्ठ नागरिक अड़. द.कृ.चरड़ै यांचे शाखाध्यक्ष यशवंत सरुरकर यांनी शाल व श्रीफळ अर्पण करून सत्कार केला. याप्रसंगी श्री चरड़ै यांनी मौलिक देणगी रु.2100 विदर्भ साहित्य संघाला दिली. शेवटी प्रसाद वितरणाने समारोप करण्यात आला. संचालन संजय निसल व माणिक गेडाम यांनी मानले. आयोजनासाठी सचिव प्रदीप व्यवहारे,नितिन गोखले, नंदू बापट आदींनी परिश्रम घेतले.