राज्य सरकार शेतकरी विरोधी – आ. फुके

0
34

साकोली--कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकार शेतकर्‍यांवर अन्याय करीत असून राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आज जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकर्‍यांना बोनस अर्धे पैसे आले असून उन्हाळी ध्यानाचे चुकारे शेतकर्‍यांना मिळालेच नाही येत्या चार दिवसात शेतकर्‍यांना धानाचे चुकारे व दोन अशी रक्कम खात्यात जमा झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण करू असा इशारा आमदार डॉ. परिणय फुके यांनी शुक्रवारी साकोली येथील जुनी पंचायत समितीच्या प्रांगणात भाजपाच्या दोन दिवसीय लाक्षणिक उपोषणाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते माजी आमदार बाळा काशीवार, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर, नेपाल रंगारी नगराध्यक्ष धनवंता राऊत, मनीष कापगते, किशोर पोगळे, तालुका अध्यक्ष लखन बर्वे, रवी परशुरमकर, नरेंद्र वाडीभस्मे, अँड. अवचते उपस्थित होते. कालपासून भाजपाच्या किसान सेलतर्फे शेतकर्‍यांना धानाचे चुकारे मिळण्यात यावे, बोनसची उर्वरित रक्कम तत्काळ मिळावी, चालू कृषी संशोधकांना प्रोत्साहन ५0 हजार रुपये देण्यात यावे यासाठी दोन दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू होते. आज या उपोषणाची दखल घेत शासनातर्फे तहसीलदार रमेश कुंभरे यांनी उपोषण नाला भेट दिली. निवेदन स्वीकारून परिणय फुके यांच्या नेतृत्वात उपोषणाचा समारोप करण्यात आला ,मात्र चार दिवसात शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य न झाल्यास, आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही डॉ. फुके यांनी दिला.