ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी मुंडण आंदोलन

0
18

सांगली–ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी हक्क परिषदेच्या वतीने मुंडण आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने तातडीने राजकीय आरक्षण लागू करावे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. सरकारकडून याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास विधानभवनावर मोर्चाद्वारे धडक देण्याचा निर्धार यावेळी जाहीर करण्यात आला. आंदोलनामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला आहे.
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने हे आरक्षण पूर्ववत सुरू करावे या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक बनला आहे. गेल्या महिनाभरात ओबीसी हक्क परिषदेने राज्यभर आंदोलने करून या मुद्दय़ाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ओबीसी हक्क परिषदेने मुंडण आंदोलन केले. मुंडन करून सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला यावेळी बोलताना ओबीसी हक्क परिषदेचे नेते संग्राम माने म्हणाले राज्यात ५४ टक्के ओबीसी समाज असताना देखील समाजाचे राजकीय आरक्षण काढून घेतले. या निर्णयामुळे ओबीसी समाज हा मुख्य प्रवाहापासून बाजूला जाण्याची भीती आहे. शिवकालात ओबीसी समाजाला सन्मानाचे स्थान होते. त्यानंतर तीनशे वर्षांनी राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसींना इतर समाजांच्या बरोबरीने येण्याची संधी मिळाली होती. मात्र राज्य सरकारने हे आरक्षण हटवल्याने पुन्हा एकदा ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करावे अन्यथा मुंबईत विधानभवनावर मोर्चा काढला जाईल.