शेतकर्यांसाठी आ.वड्डेटीवार विधानभवन पायर्यावर बसले उपोषणाला

0
14

नागूपर,दि.14-चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही सरकारने जिल्ह्यातील शेतकर्यांना न्याय देण्याएैवजी त्यांच्याशी अन्याय केला आहे.तसेच शेतकर्यांचे कर्ज माफ करुन चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे या मागणीला घेऊन काँग्रेसचे आमदार व विधानसभेचे उपगटनेते विजय वड्डेटीवार यांनी नागपूर विधानभवनाच्या पायरायवर आमरण उपोषण आंदोलनाला सुरवात केली आहे.वड्डेटीवारांच्या आंदोलनाने पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे प्रश्न विधानसभेसमोर येऊ लागले आहेत.

 संपूर्ण चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, धानाला ३ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल भाव देण्यात यावा, ब्रम्हपुरी येथे एम. आय. डी. सी. मंजूर करण्यात यावी, सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ मंजूर करण्यात यावे, सिंदेवाही येथे नगरपंचायत मंजूर करावी, ब्रम्हपुरी येथे अनुसूचित जमातींच्या मुलींसाठी वसतिगृहाचे बांधकाम करण्यासाठी निधीसह प्रशासकीय मान्यता मिळावी आदी मागण्यांसाठी ते आमरण उपोषण उपोषण करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

चंद्रपूर जिल्हा प्रचंड दुष्काळाच्या छायेत असून अनेक ठिकाणी दुबार, तिबार पेरणी करून सुद्धा संपूर्ण पिके उद्ध्वस्त झाली आहेत. शेकडो एकर शेतीमध्ये पिका ऐवजी नुसती तणीस दिसत असून जी काही पिके उभी आहेत त्यात ५० टक्के सुद्धा उत्पन्न होणार किंवा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत प्रत्यक्ष शेतावर जाऊन सर्वे करून सरकारला अहवाल पाठविणे जरुरीचे असताना फक्त कागदोपत्री अहवाल पाठविल्यामुळे चंद्रपूर जिल्हा शासनाच्या दुष्काळग्रस्त यादीमधून वगळण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला.या आंदोलनात  चंद्रपुर जिल्हा कांग्रेस कमेटी चे अधक्षय प्रकाश देवतले व् कांग्रेस नेते महेश मेंढे सहभागी झाले आहेत.