पेट्रोल होणार ४ रुपयांनी स्वस्त?

0
9
नवी दिल्ली, दि, १४ – आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर ११ वर्षांपूर्वीच्या स्तरावर पोहोचल्याने येत्या काही दिवसात पेट्रोलची किंमत प्रतिलीटर चार रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे.
तेल कंपन्या दर पंधरा दिवसांनी इंधन दरांचा आढावा घेतात.  मागील पंधरवड्यात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ११ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे तेल कंपन्या पेट्रोल व डिझेलच्या दराबाबत समीक्षा करणार असून उद्याच न्वया दरांबाब घोषणा होण्याची शक्यता आहे. पेट्रोलचे दर आता प्रती लिटर १  पाऊंडच्या खाली पोहोचला असून ब्रेंट क्रूड तेलाचे दर प्रति बॅरल ३९ डॉलरवर पोचले आहे.