शहर भाजपध्यक्ष पदासाठी केलनका वरचढ

0
4

गोंदिया,दि.7-भारतीय जनता पक्षाच्या गोंदिया जिल्हाध्यक्ष पदासह सर्वच तालुकामंडळ आणि गोंदिया व तिरोडा शहर अध्यक्षपदासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष पदाला घेऊन चांगलेच वातावरण तापले आहे.विद्यमान अध्यक्षांना भाजपने पुन्हा संधी देऊ नये या विचाराचा गटही सक्रिय आहे.तर दुसरीकडे जिल्हाध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्यासह माजी आमदार केशवराव मानकर व हेमंत पटले यांच्या नावावरही खलबत्ते सुरु झाले आहेत.गोंदिया शहर अध्यक्षपदासाठी युवा चेहरा म्हणून सुनिल केलनका यांचे नाव पुढे आले आहे.त्यांच्यासोबतीला संजू मुरकूटे व दिपक कदम यांचीही नावे चर्चेत असल्याचे बोलले जात आहे.विशेष म्हणजे भाजपमध्ये लोकशाहीने सर्व होत असल्याचे सांगितले जात असले तरी शेवटी नागपूरच्या गडकरीवाड्यातून जिल्हाध्यक्ष निवडला जाणार आहे.त्यामुळे विद्यमान अध्यक्षांनाच अधिक संधी दिसून येते त्यांच्या नावाला चांगलाच विरोध झाला तर इंगळे यांच्या एैवजी मानकर चालतील असा सुर तयार करुन मानकरांच्या गळ्यातही जिल्हाध्यक्षपदाची माळ भाजप देऊ शकते.गोंदिया शहर अध्यक्षपदाच्या बाबतीत मात्र वेगळेच असून या ठिकाणी आथिर्कपरिस्थितीसह सर्वच गोष्टीमध्ये सुनिल केलनका यांचे वजन अधिक असून त्यांनी सर्वांनाच सोबत घेऊन राजकारण सुरु ठेवल्याने त्यांच्या नावाचा फारसा विरोध होण्याची शक्यता नाही.त्यामुळे शहरभाजपच्या अध्यक्षपदासाठी सुनिल केलनका व दिपक कदम यांच्यापैकी कुणाचा विचार होईल.विद्यमान अध्यक्ष भरत क्षत्रिय हे शांत व मनमिळाऊ असून त्यांना कडक व टिकेचे राजकारण जास्त जमत नसल्याने आणि त्यांनीही सर्वांना सोबत घेऊनच काम केल्याने पक्ष त्यांच्या सुध्दा विचार पुन्हा करु शकतो अशी चर्चा असली तरी भाजपमध्ये रिपीट करण्याची परंपरा सुध्दा फार कमी आहे.