65 व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या संमेलन चिन्हाचे मुनगंटीवाराच्या हस्ते अनावरण

0
10

चंद्रपूर,दि.7-मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान चंद्रपूर व्दारा येत्या 29, 30 व 31 जानेवारी 2016 रोजी येथील पोलीस फुटबाल ग्राऊंडवर विदर्भ साहित्य संघाचे 65 वे विदर्भ साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या संमेलन चिन्हाचे अनावरण आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संमेलनाचे मुख्य संरक्षक आणि राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी हे संमेलन अत्यंत दर्जेदार व यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर उपस्थित होते.

हे संमेलन चिन्ह मनोवेधचे प्रसिध्दी प्रमुख व कला शिक्षक किरण कत्रोजवार यांनी तयार केले असून या वेळी पालकमंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष विजय बदखल, मुख्य कार्यवाह प्रशांत आर्वे, मनोज साळवे, सुशील कपुर, अनिल पेटकर, शाम हेडाऊ, अविनाश देव, प्रशांत मडपुवार, पंकज चीमरालवार आदि उपस्थित होते.