अशोक चव्हाण यांच्याविरोधातील गुन्हे मागे घ्या

0
10

भंडारा दि.6:: आदर्श गैरव्यवहार प्रकरणी खासदार अशोक चव्हाण यांच्याविरोधात सुडबुध्दीने दाखल केलेले गुन्हे व चौकशी मागे घेण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार सेवक वाघाये यांच्या नेतृत्वातील जिल्हा काँग्रेस पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.शिष्टमंडळात माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, सभापती विनायक बुरडे, प्यारेलाल वाघमारे, नंदू समरीत, मंदा गणविर, निलकंठ टेकाम, प्रेम वनवे, ज्ञानेश्‍वर राहांगडाले, मनोज मते, सुबोध इनवाने, वंदना पंधरे, दिपक जेठे, शिवा मते, के.के.पंचबुध्दे, श्रीराम चवरे, जितेद्र भदाडे, राजेश खेडीकर, आकाश कोरे, लाखनी नगरपंचायतीचे काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते