देवरी तालुक्यात आ.कोरोटे यांची जादू… २५ पैकी १७ ग्रामपंचायतीवर फडकवला कांग्रेसचा झेंडा

0
39

■ कांग्रेस पक्षाचा दावा.
■ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या दिग्गजांची दमछाक .
————————————————-
देवरी,ता.२१ :  जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींचा निवडणूक थाटात पार पडली असून त्यांचे निकाल काल मंगळवार (ता.२० डिसेंबर रोजी) येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे धोषित करण्यात आले. सदर निवडणुकीचे निकाल बघता देवरी तालुक्यात आमदार सहसराम कोरोटे यांची जादू चालली असून तालुक्यात मोठ्या संख्येंने कांग्रेसचे समर्थित सरपंच निवडून आले आहेत. देवरी तालुक्यात एकूण २४ ग्रामपंचायतीचे निवडणुका पार पडले असून १ ग्रामपंचायत डवकी येथील निर्विरोध होती. यामध्ये १७ ग्रामपंचायतीवर काँग्रस समर्थित उमेदवार निवडून आल्याचा दावा काँग्रेस पक्षांनी केला आहे. तर भाजप ने ८ ग्रामपंचायतीवर आपला दावा केला आहे.
विशेष म्हणजे ग्रामपंचायत ओवारा येथील भाजपचे अनुभवी व १५ वर्षापासून सरपंच असलेले कमल येरणे यांचा दणदणीत पराभव झाला असून त्यांचा पुतण्या भावराव येरणे यांनी निवडणुकीच्या २ दिवसाआधी कांग्रेस पक्ष प्रवेश करुन बाजी मारली आहे.
त्याचप्रमाणे भाजप चे माजी आमदार संजय पुराम यांचे गृहगाव ढीवरीनटोला येथे सुद्धा कांग्रेसच्या उमेदवार दिलीप जुळा हा विजय झाला असून ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप ची चांगलीच दमछाक झालेली आहे.
देवरी तालुक्यातील कांग्रेस पक्ष समर्थित विजयी झालेल्या १७ सरपंचां मध्ये मुल्ला- कल्पना मुकुंदराव बागडे, मुरपार- दुर्गाबाई विजय उईके, ओवारा-भाऊराव सुखराम येरणे, चिचेवाडा- लता गावड, डवकी-गौरव शामराव परसगाये (निर्विरोध ), नकटी-पल्लवी उमेश मडावी, मैसूली-जगन सलामे, हरदोली-गोरेलाल मलये, ढिवरीनटोला- दिलीप जुळा, आमगाव-रवींद्र वालदे, शिरपूर/भागी-पुष्पा राऊत, चिचगड-भाग्यश्री भोयर, वांढरा- रेवता अत्तरगडे, केशोरी-अनुसया करमकर, पिपरखारी- अलका भारद्वाज, मगरडोह-मालन कोरेटी, फुक्कीमेटा- सुलोचना सरोत आदींचा समावेश आहे .
ह्या सर्व नवनिर्वाचीत सरपंच व ग्रा.पं. सदस्याचे निवडून आल्याबद्दल आमदार भवनात विजय उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आमदार सहषराम कोरोटे, तालुका कांग्रेस अध्यक्ष संदिप भाटिया, देवरी शहर अध्यक्ष कुलदिप गुप्ता, महिला कांग्रेस तालुकाध्यक्ष सुनंदाताई बहेकार , युवक कांग्रेस विधानसभा अध्यक्ष दिपक (राजा)कोरोटे, जिल्हा महासचिव बळीराम कोटवार , नरेश राऊत, सचिन मेळे ,जैपाल प्रधान, अविनाश टेंभरे यांच्यासह तालुक्यातील कांग्रेस पक्षातील प्रमुख पदाधिकारी,नेते, कार्यकर्ते व नवनिर्वाचीत सरपंच व ग्रा.पं सदस्य बहुसंख्येने उफस्थित होते .

त्याच प्रमाणे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात सालेकसा आणि देवरी तालुक्यात कांग्रेस पक्ष समर्थित सरपंच व ग्रा.पं. सदस्याचा चा दणदणीत विजय झाला असून सदर ग्रामपंचायत निवडणुकीत कांग्रेसचे प्रदर्शन जोरदार असल्याचे बघावयास मिळाले आहे.