नवीन रिक्षा रस्त्यावर दिसल्या जाळून टाका – राज ठाकरे

0
6
वृत्तसंस्था
मुंबई, दि. ९ – नवीन रिक्षा तुम्हाला रस्त्यावर दिसल्या तर, चालक आणि प्रवाशांना रिक्षातून उतरवा आणि त्या रिक्षा जाळून टाका अशा शब्दात कार्यरत्याना आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या १० व्या वर्धापनदिन मेळाव्यात बोलताना मेळाव्यात दिले. 
व्यावसायिक राहुल बजाज यांच्या कारखान्यात ७० हजार रिक्षा तयार आहेत. या रिक्षांच्या विक्रीसाठी ७० हजारे परवाने देण्याचा घाट घालण्यात आला आहे.रिक्षा चालकांना ७० हजार परवान्यांचे वाटप करण्याची इतकी घाई कशाला? ७० हजार परवान्यांमध्ये ७० टक्के परवाने परप्रांतीयांना देणार आहेत. सर्वच्या सर्व ७० हजार परवाने मराठी मुलांना का नाहीत ? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. 
 रिक्षा परवान्यासाठी मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाला स्थगिती देणा-या नागपूरच्या न्यायाधीशांच्या निर्णयावर राज ठाकरे यांनी टिका केली. सरकारी व्यवस्था असताना न्यायाधीश कसे निर्णय देतात ? न्यायापालिकेचा आदर टिकेल अस वागा असे राज ठाकरे न्यायाधीशांना उद्देशून म्हणाले. 
जे काँग्रेसच्या राजवटीत सुरु होत तेच आताही सुरु आहे असे सांगत त्यांनी शिवसेना-भाजप सरकारवर टिका केली. बँकांचे पैसे बुडवल्यानंतर बँका सर्वसामान्यांच्या मागे लागतात मग इतक मोठा विजय मल्ल्या बँकांचे पैसे बुडवून कसा पळून गेला ? असा सवाल राज यांनी केला.