डॉ प्रभाकरराव उपाख्य दादासाहेब टापरे यांचे निधन

0
11

बुलढाणा-संजय गांधी कापूस उत्पादक सहकारी सुतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार श्रद्धाताई टापरे यांचे पती तसेच गिरणीच्या विद्यमान अध्यक्षा अंजलीताई टापरे यांचे वडील डॉ. प्रभाकरराव टापरे यांचे आज दिनांक २४ फेब्रुवारी रोजी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे वय ८९ वर्षाचे होते.
दादासाहेब यांनी वीस वर्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय सेवा दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, सून व नातवंडे असा आप्त परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या निवास स्थानावरून निघणार आहे . तर सूतगिरणीच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे.