देवरीत ना. गडकरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

0
12

 

देवरी- भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीयमंत्री ना. नितीन गडकरी यांचा वाढदिवस देवरी येथे भाजपच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्त देवरीआमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांचे हस्ते ग्रामीण रुग्णालयात फळ आणि बिस्किटांचे वितरण करण्यात आले. यावेळी देवरीच्या सभापती देवकी मरई, नगरसेवक यादोराव पंचमवार, तालुका महामंत्री प्रवीण दहिकर, विनोद भेंडारकर, सुकचंद राऊत, सीताराम शहारे, राजू शाहू, कुलदीप लांजेवार, सोनू चोपकर, डॉ. जितेंद्र रहांगडाले, नूतन सयाम, सुनीता गावड, कौशल्या कुंभरे, कोकिळा दखणे,राजीक खान, माजीद खान,कमल येरणे, अशोक राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.