साधनव्यक्ती, विषयतज्ञ कर्मचाNयांचा आंदोलनाला युवा स्वाभिमानचा पाठींबा

0
22
गोंदिया : शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविण्याच्या उद्देशाने कार्यान्वित केलेल्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या साधनव्यक्ती आणि विषयतज्ञ वंâत्राटी कर्मचाNयांना ३० मे २०१३ च्या परिपत्रकान्वये अतिरिक्त ठरवून त्यांचे गृह जिल्ह्याबाहेर ३०० ते ४०० कि.मी. अंतरावरील विभागात समायोजन करण्यात आले. यामुळे त्यांचे कौटुंबीक प्रश्न उभे झाले. या अन्यायात्मक धोरणाचा विरोध करून न्यायासाठी मुंबई येथे सदर कर्मचारी आंदोलनाला बसले. दरम्यान युवा स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष आ.रवि राणा आणि गोंदिया युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी त्यांची भेट घेवून आंदोलनाला पाठींबा जाहीर केला.
विशेष म्हणजे गृह जिल्ह्यापासून लांब अंतरावर साधनव्यक्ती व विषयतज्ञांना वंâत्राटी तत्वावर पाठविण्यात आले आहे. त्यांच्यापुढे कौटुंबिक समस्या निर्माण झाल्याने अनेकांनी नोकNयादेखील सोडल्या. ही समस्या शासनाने दुर करून गृहजिल्ह्यात नियुक्ती द्यावी. यासाठी अनेकदा निवेदनातून मागण्या करण्यात आल्या. परंतु शासनाने दुर्लक्ष केल्याने २४ मे रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर या कर्मचाNयांनी धरणे आंदोलनात शासनविरोधात निदर्शने केले. त्यांच्या या आंदोलनाला युवा स्वाािभमानने पाठींबा दिला. संस्थापक अध्यक्ष आ.रवि राणा आणि युवा स्वाभिमानचे गोंदिया जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी आंदोलनस्थळी कर्मचाNयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडवणुकीसाठी नेहमी सोबत राहणार असल्याचे सांगितले.