एकनाथ खडसेंचं मंत्रीपद जाणार ?

0
7
मुंबई,  दि. 02 – भोसरी जमीन खरेदी प्रकरण आणि कथित दाऊद फोन कॉल प्रकरणी गेले काही दिवस वादात असलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचं मंत्रीपद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी या प्रकरणी अहवाल मागवल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत असून एकनाथ खडसेंच्या विषयावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा होण्याची शक्यता आहे.एकीकडे नरेंद्र मोदी यांनी न खाऊंगा, न खाने दंूगा, असे जाहीर केले होते, पण त्यांच्या या दाव्यातील पोकळपणा उघड झाला आहे, अशी टीका काँग्रेसच्या प्रवक्त्या सुश्मिता देव यांनी केली. खडसे यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेसमोर आले असूनही पंतप्रधान त्याबद्दल गप्प का आहेत, त्यांना खडसे यांचा भ्रष्टाचार दिसत कसा नाही, असा सवालही त्यांनी केला.