मेडीकल काॅलेज परिसरात आग

0
8

नागपूर-येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात असलेल्या मुलींच्या वस्तीगृहाकडील भागात आग लागल्याची घटना आज दुपारी घडली.या आगीत आठ ते दहा मोटारसायकल वाहने जळाल्याचे वृत्त येत आहे.विद्याथीर्नीनी अग्निशमन विभागाला वारंवार दुरध्वनीकरुनही त्या विभागाकडून फोनवर माहिती न घेताच फोन ठेवल्याचा प्रकारही घडल्याचे वृत्त आहे.वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील सुरक्षारक्षक ,विद्यार्थी यांनीच आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आग लागून अर्धा तासाचा कालावधी लोटूनही अग्निशमक विभाग मात्र पोचायचे होते