काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षपदी उषा शहारे,प्रदेश उपाध्यक्षपदी उषा मेंढे

0
11

गोंदिया,-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या महिला काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान महिला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष उषा मेंढे यांना प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदावर बढती देण्यात आली.तर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी देवरी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य उषा शहारे यांची निवड करण्यात आली आहे.या दोन्ही निवडीत कुठल्याही आजी माजी आमदाराचा पाठपुरावा नसून प्रदेशस्तरावरील नेत्यांनी या नावाची घोषणा केली आहे.