येणाऱ्या निवडणुकीत उत्साहाने काम करा – राजेंद्र जैन

0
39

गोंदिया,दि.१३ः-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बूथ कमिटीची बैठक शीतला माता मंदिर चौक, सुर्याटोला येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. नागरिकांच्या सर्व समस्यां जाणून घेत त्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन यावेळी नागरिकांना दिले.

बैठकीला राजेंद्र जैन यांनी विविध विषयांवर संबोधित केले. विधानसभा निवडणुकीसाठी थोडाच अवधी आता शिल्लक आहे या पार्श्वभूमीवर आपल्याला सर्वांना अधिक ऊर्जा, उत्साह आणि जोमाने काम करायचे आहे असे आवाहन केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत जनहितासाठी राबविण्यात आलेल्या योजना, कल्याणकारी निर्णय समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवायचे आहेत. तसेच महायुती सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी, महिला, कामगार, कष्टकरी, विद्यार्थी यांसाठी राबविलेल्या आणि राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती सर्वांनी प्रत्येक जनसामान्य नागरिकापर्यंत कशी पोहचवावी याबाबत मार्गदर्शन देखील केले.

यावेळी राजेंद्र जैन यांच्या सोबत सर्वश्री नानू मुदलियार, केतन तुरकर, सुनिल पटले, शैलेश वासनिक, नागो बनसोड, सोहनलाल गौतम, किसन वाढीवे, माधवराव रहांगडाले, शिवशंकर नागमोते, भुनेश्वर गुढीकर, गणपत बघेले, संजय गौतम, छगन गौतम, धनलाल गौतम, चंद्रशेखर पटले, मुलचंद रहांगडाले, वसंत पटले, छोटू कटरे, घनश्याम लांजेवार, योगेश रहांगडाले, गोवर्धन बारबुधे, अजय ठाकरे, नितीन वाढीवे, बहादुर कटरे, नेत्राम गौतम, तोरेश्वर गौतम, विलास राऊत, छायाबाई वाढीवे, मंगला गाते, त्रिवेणी कटरे, मायाबाई कटरे, देवचंद पटले, रमेश गौतम, अजय गौतम, चिखलोंढे, ऋषीपाल कटारे, राजू कटारे, राजू करंडे, शंकर गौतम, रामलु गौतम, नंदकिशोर वंजारी, हितेश बागडे, कमलेश बागडे, सुरेंद्र लांजेवार, अशोक खापेकर, केवल पाटील, राजेंद्र कटारे, बड्या राऊत, नितीन बागडे, सुरेंद्र बागडे, हनुरू बाळबुधे, दिलीप लांजेवार, सचिन कटारे, जितू चौधरी, अतुल गौतम, रूपलाल रहांगडाले, फेकलाल रहांगडाले, ओमेंद्र तुपकर, संजू तुपकर, बबलू तुपकर, मोहन अदीक, नरेश चौधरी, सुरेश गौतम, नंदकिशोर गौतम, राहुल गौतम, अशोक करडे सहित मोठ्या संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते.