मंत्रिपद न मिळाल्याने विनायक मेटे नाराज

0
11

मुंबई,दि.08-अाज झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्याने शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे नाराज झाले आहेत. त्यामुळे ते विधानपरिषदेच्या आमदारकीची शपथ घेण्यासाठीही गेले नाही. भाजपने आश्वासन पाळले नसल्याचे मेटे यांनी आरोप केला आहे.
मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे, कोणाला घेऊ नये, हा सत्ताधारी पक्षाचा निर्णय आहे. परंतु, शिवसंग्राम पक्षाला दिलेले आश्वासन भाजपने पाळले नसल्याचे शिवसंग्राम पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाले आहे. त्यामुळे त्यांना आपल्याला अाज सकाळी झालेल्या शपथविधी सोहळ्याला जाऊ दिले नसल्याने विनायक मेटे यांनी म्हटले आहे. भाजपने आमच्या पक्षाच्या बाबत वेगळी भूमिका का घेतली, आम्हाला का न्याय दिला नाही, या मागील कारण समजले नसल्याचे मेटे यांनी म्हटले आहे.