१० जुलै ला ओबीसी समाजाची बैठक नागपूरात

0
12

नागपूर,दि.10-विदर्भातील सर्व ओबीसी संघटना मिळून येत्या ७ ऑगस्ट २०१६ रोज रविवारला, राष्ट्रीय ओबीसी महासंग तर्फे डॉ.पंजाबराव देशमुख सभागृह,धनवटे नॅशनल काँलेज येथे एक दिवसीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनाच्या तयारीसंदर्भात १० जुलै रोज रविवारला दुपारी १2 वाजता धनवटे नॅशनल काँलेज नागपूरच्या सभागृहात बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकित नागपूर येथे होणाऱ्या आधीवेशासाठी स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य बबनराव तायवाडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच ओबीसी अधिवेशन समिती,समन्वय समिती,प्रचारप्रसिध्दी समिती,अर्थविषयक समिती,भोजन समिती,वक्ता व संचालन समिती,साहित्य निर्मिती समिती,मान्यवर व्यवस्थापन समिती,स्मरणिका प्रकाशन समितीचा विस्तार करण्यासाठी यावर चर्चा करण्यात येणार आहे.तरी सर्व ओबीसी संघटनाच्या प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते,समाजसंघटनेचे पदाधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.