मातोश्रीवर राज, उद्धवची ‘बंधू’ भेट

0
6

मुबंई, दि. 29 – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 4 वर्षानंतर आपले बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची शुक्रवारी भेट घेतली. राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. तब्बल सव्वा तास राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एका खोलीत बसून चर्चा केली तसंच एकत्र जेवण केल्याचीही माहिती मिळाली आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्याही शुभेच्छा दिल्या. तसंच निघण्याआधी बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेचं दर्शनही घेतलं. मात्र राज ठाकरेंच्या भेटीमागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.