त्या दुष्काळग्रस्त ८४ गावांना मिळणार शासनाची मदत

0
9

– आमदार संजय पुराम यांनी मांडला विधानसभेत मुद्दा

सालेकसा,दि.29-आमगाव विधान सभा क्षेत्राअंतर्गत येणाèया दुष्काळग्रस्त ८४ गावांना शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. याशिवाय पीक विम्याचे देयके देखील मृगजळ ठरत आहेत. खरीप हंगामाला सुरुवाता होऊनही शेतकरी हतबल आहे. त्यामुळे देवरी-आमगाव विधानसभेचे आमदार संजय पुराम यांनी विधीमंडळात २७ जुलै रोजी हा मुद्दा उपस्थित केला असून या अनुषंगे प्रधान सचिवांना पत्रही दिले आहे.
गत वर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकèयांपुढील समस्या वाढल्या होत्या. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम काढायचा कशा? असा प्रश्न आजही शेतकèयांपुढे आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा क्षेत्रांतर्गत २०१५-१६ या वर्षात ८४ गावे दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत करण्यात आली होती. अद्यापही शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत शेतकèयांना मिळाली नाही. इतकेच नव्हे तर पीक विम्याचे देयके मिळण्याचे कोणतेही चिन्ह नाही. सध्या नविन खरीप हंगामाला सुरुवात झाली असून या दरम्यान शेतकरी पेरणी व रोवणी प्रक्रिया पार पाडत असतो. परंतु पैसे उपलब्ध नसल्याने तसेच बँकांचे पीक कर्जाचे उदासीन धोरण यामुळे जिल्ह्यातील बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने या संदर्भात तात्काळ कारवाई करून शेतकत्यांना आर्थिक संकटांतून बाहेर काढावे अशी मागणी आमदार पुराम यांनी सभागृहात केली. विधीमंडळात औचित्याच्या मुद्यामध्ये हा मुद्दा उपस्थित करून कारवाई संदर्भात प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य यांना पत्रही दिले आहे. आ. पुराम यांच्या मुद्यांची शासनाने गंभीर दखल घेतली असून लवकरच मदत निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. आ. पुराम यांच्या या प्रयत्नाने अनेक शेतकèयांना दिलासा मिळणार आहे.