हेपतुल्ला मणिपूरच्‍या तर नागपूर माजी खासदार बनवारीलाल पुरोहित आसामचे राज्‍यपाल

0
14

वृत्तसंस्था
नवी दिल्‍ली – राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी माजी केंद्रीय मंत्री तथा भाजप खासदार नजमा हेपतुल्‍ला यांची मणिपूर, नागपूरचे माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांची आसाम आणि व्‍ही. पी. सिंग यांची पंजाबच्‍या राज्‍यपालपदी निवड केली. दरम्‍यान, जगदीश मुखी यांच्‍यावर अंदमान निकोबारच्‍या नायब राज्‍यपालाची कमूान सोपवली आहे.

कोण आहे नजमा हेपतुल्‍ला ?
> डॉ. नजमा अकबरअली हेपतुल्ला यांचा जन्म 13 एप्रिल 1940 रोजी झाला.
> त्‍यांनी कॉंग्रेसमधून आपल्‍या राजकीय जीवनाला सुरुवात केली.
> 2004 मध्ये त्‍यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
> नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांना अल्पसंख्यांक कार्याचे मंत्रीपद सांभाळले होते.
> गत महिन्‍यांत त्‍यांनी आपल्‍या मंत्रीपदाचा राजीनाम दिला होता.

बनवारीलाल पुरोहित
पुरोहित यांनी कॉंग्रेसमधून आपल्‍या राजकीय जीवनाला सुरुवात केली. नागपूर लोकसभा मतदार संघातून 1984 आणि 1989 अशा दोन वेळा ते कॉंग्रेसकडून निवडून गेले होते. राम मंदिराच्‍या प्रश्‍नावरून त्‍यांनी कॉंग्रेस सोडून भाजपमध्‍ये प्रवेश केला. त्‍यावेळी 1991 मध्‍ये झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत त्‍यांना कॉंग्रेसच्‍या दत्‍ता मेघेंकडून पराभव स्‍वीकाराला लागला होता. त्‍यानंतर 1996 मध्‍ये भाजपच्‍या तिकिटावर ते नागपूर लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते.

जगदीश मुखी

1 डिसेंबर 1942 रोजी जन्‍मलेले जगदीश मुखी हे भाजपचे ज्‍येष्‍ठ नेत आहेत. दिल्‍ली विधानसभा निवडणुकीत त्‍यांच्‍या विरोधात त्‍यांचे जावाई सुरेश कुमार यांचीच कॉंग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्‍यामुळे त्‍यांचे नाव देशभर चर्चेत आले होते.