गुंगीचे औषध देऊन महिलेवर सामूहिक बलात्कार, 6 जण ताब्यात

0
14

नागपूर,दि.17: राज्याची उपराजधानी असलेले व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर असलेल्या नागपूरमध्ये 40 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. महिलेचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.गुंगीचे औषध देऊन महिलेचं बेशुद्ध अवस्थेत अपहरण करण्यात आले त्यानंतर रामनगर परिसरात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी 7 आरोपींपैकी 6 आरोपींना ताब्यात घेतले असून सध्या त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.नागपूरमधील अत्यंत रहदारी असणाऱ्या बाजार परिसरात स्वयंरोजगार करणाऱ्या या महिलेला गुंगीचे औषध देऊन तिथून तिचे अपहरण केले. बलात्काराच्या या घटनेने नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे