राष्ट्राचा विकास हेच ध्येय ठेऊन सर्वांनी कार्य करावे – पालकमंत्री बडोले

0
15

– भाजपा अल्पसंख्यक आघाडी जिल्हा बैठक
गोंदिया,berartimes.com दि.6 : आपल्या देशाला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. अनेक धर्म, विविध जाती, पंथ व भाषांमुळे हिंदुस्थानला संपूर्ण जगात एक वेगळी ओळख आहे. म्हणूनच कवी इकबाल म्हणतात ‘सारे जहाँ से अच्छा, हिन्दोसिता हमारा.. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तिन्ही गोष्टीला एका माळेत टाकून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली आहे. अखंड राष्ट्रवाद व राष्ट्राचा विकास हा भारतीय जनता पार्टीचे मुख्य ध्येय असून माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दूल कलाम यांच्याकडून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी. मागील साठ वर्षात फक्त अल्पसंख्यक समाजाच्या मतांचा वापर करून राजकारण करणाèयाचा खरा चेहरा समोर आला आहे. केंद्रात व राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा सरकार कार्य करीत असून अल्पसंख्यक समाजाच्या शिक्षणापासून तर सर्वांगीण विकासाकरीता अनेक योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. या योजनांचा प्रत्येकाने लाभ घ्यावा व राष्ट्र विकासाचे ध्येय ठेऊन सर्वानी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच जिल्ह्यात मौलाना आझाद महामंडळाचे कार्यालय नव्हते व तशी मागणी होती यामुळे हे कार्यालय येथे सुरु होत आहे. अधिकाèयाची नेमणूक झाल्याचे हि त्यांनी या वेळी सांगितले. यामुळे जिल्ह्यातील मुस्लिम समाजाला अनेक योजनांचा लाभ घेणे सोयीस्कर होणार असल्याचे पालकमंत्री व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले म्हणाले. ते भाजपा अल्पसंख्यक आघाडीच्या विस्तारित जिल्हा बैठकीत उदघाटक म्हणून बोलत होते.
येथील प्रीतम लान येथे ४ सप्टेंबर रोजी अल्पसंख्यक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत प्रामुख्याने खासदार नानाभाऊ पटोले, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, माजी आमदार भजनदास वैद्य, माजी आमदार भेरसिंग नागपुरे, माजी आ खोमेश रहांगडाले,माजी जि प अध्यक्ष नेतराम कटरे, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, अल्पसंख्यक आघाडी जिल्हाध्यक्ष अल्ताफ हमीद, अल्पसंख्यक प्रदेश उपाध्यक्ष कलाम शेख, जि प सभापती देवराज वडगाये, अ‍ॅड. अशफाक शेख, भाजपा जिल्हा महामंत्री वीरेंद्र अंजनकर, लायकराम भेंडारकर, रविकांत बोपचे, नासिरुद्दीन भालवानी आदी उपस्थित होते.
या वेळी खासदार पटोले म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकाआधी देशात विचित्र वातावरण निर्माण करण्यात आले होते. मुस्लिम समाजाच्या मनात भाजपा विरोधी व भीती निर्माण करणाèया अनेक गोष्टी टाकण्यात आलेल्या होत्या. मात्र आज प्रत्यक्षात मुस्लिम समाजाच्या लक्षात आले आहे, विकास कोण करतोय. भारत देशाला जगात सर्वात पुढे नेण्याकरीता मोदीजी वेगाने कार्य करीत आहेत आणि हे सर्व आपल्या सर्वांच्या सहकार्याने साध्य होणार आहे. प्रदेश अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी सर्वप्रथम अल्पसंख्यक आघाडीच्या नवीन कार्यकारिणीला शुभेच्छया देऊन संघटनेसंदर्भात मार्गदर्शन केले. ते म्हणाले कि भारतीय जनता पार्टी ही कार्यकत्र्यांची पार्टी असून यात कुणीही मालक किंवा संचालक नाही. इथे जात, पात व धर्म बघून संधी मिळत नसते तर सामन्यातील सामान्य कार्यकत्र्याला त्याच्या योग्यतेनुसार संधी मिळते. आम्ही एकसंघ लढलो नसतो तर स्वातंत्र्य मिळाले नसते. तसेच आज देशात पसरलेल्या आतंकवाद, नक्सलवाद, बेरोजगारी, भ्रष्टाचार, निरक्षरता दूर करून जातीमुक्त समाज निर्माण करण्याकरीता कार्य करायचे आहे. म्हणूनच समाजाची सेवा करण्यासाठी मुस्लिम समुदायाचे लोक भाजपात मोठ्या संख्येने पुढे येत आहेत असेही ते म्हणाले. जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी भाजपचा कार्यकर्ता हा संस्कारातून घडलेला असतो. तसेच समाजकारणातून राजकारण करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ हमीद यांनी केले.
या प्रसंगी आ विजय रहांगडाले, आ संजय पुराम, विनोद अग्रवाल, कलाम शेख, एजाज शेख यांनी हि मार्गदर्शन केले. संचालन अमीन शेख यांनी तर आभार माजीद खान यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहमद मनियार, भास्कर नागदेवे, सतविंदरसिंग भाटिया, शशिकुमार पतेह, अनिल पाटणी, सलाम शेख, गुरविंदर सिंग कौर, सुशील जैन, अन्नुभाई शेख, युनूस खान, आबिद खान, सलीम भारवानी, शकील शेख, हमजा शेख, मतीन पठाण, इमरान शेख, शाईन शेख, जहीर खान, हब्बू शेख आदींनी सहकार्य केले.