भंडारा,दि.१२ः : नगर परिषद निवडणुकींच्या तोंडावर भाजपला मोठा झटका मिळाला असून आज भाजपच्या 2 माजी नगर सेवकांनी आपल्या अन्य पदाधिकाऱ्यांसह आ. नरेंद्र भोंडेकर यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत(एकनाथ शिंदे गट) प्रवेश घेतला आहे. या प्रवेशानंतर भंडारा शहरात चर्चेला उधाण आले आहे.
यात माजी सभापती पाणी पुरवठा भुमेश्वरी मनोज बोरकर, माजी पाणीपुरवठा सभापती कैलाश तांडेकर, मनोज बोरकर भाजपा नेता, देवदास भारद्वाज, मोरेश्वर मते,नीलकंठ मंदूरकर , विजय उके, अमोल कुलसुगे, मनोज बर्वे, चेतन साठवणे यांचा समावेश आहे.
नगर परिषद निवडणुकांचे आरक्षण घोषित झाल्या नंतर विविध पक्षात हालचाली बघायला मिळत आहे.भाजपचे दोन माजी नगर सेवकांनी शिवसेनेत प्रवेश घेण्यापूर्वी भाजपच्या जिल्हा अध्यक्षांना आपला राजीनामा देत भाजप मध्ये झालेल्या दोन नेत्यांच्या प्रवेशावर नाराजगी व्यक्त केली.राजीनामा दिल्या नंतर सर्वांनी आज आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे भेट घेतली आणि त्यांच्या द्वारे भंडारा शहरात केल्या जात असलेल्या विकास कामांवर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश घेतला.





