26.4 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home राजकीय गॅसची दरवाढ व तुटवडा दूर करा-जिल्ह्यात काँग्रेसचे आंदोलन व निवेदन

गॅसची दरवाढ व तुटवडा दूर करा-जिल्ह्यात काँग्रेसचे आंदोलन व निवेदन

0
64

गोंदिया- पश्चिम आशियातील देशांमध्ये युद्धाच्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या आहेत. त्या घडामोडीचा परिणाम म्हणून देशात गॅससह पेट्रोलियम उत्पादनाचा निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील वाढत्या गॅसची दरवाढ व तुटवडा दूर करावा अशी मागणी आज गोंदिया शहर व तालुका काँग्रेस,सडक अर्जुनी तालुका काँग्रेस,तिरोडा तालुका काँग्रेस व देवरी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना निवेदनातून करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युद्ध सदृश्य परिस्थितीमुळे राज्यासह देशभरात सध्या सर्वत्र घरगुती गॅस व व्यावसायिक गॅसचा तुटवडा होत आहे अनेक विक्रेते वाढत्या भावाने कमर्शियल व घरगुती सिलेंडर विकत आहेत याला तहसीलदारांनी आळा घालणे आवश्यक आहे. तसेच देवरी तालुक्यात सर्व हॉटेल व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने मेटाकुटिला आले आहेत. सर्वत्र गॅसचा तुटवडा दिसत आहे. गॅस वेळेवर व जास्त प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने हॉटेल व पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. हॉटेल व्यवसायिक व तिथे काम करणारे कामगार सर्वांवरच बेकारीचे संकट कोसळले आहे. गॅस नसल्याने कुक, वेटर, आचारी सफाई कामगार यांचा पगार कशातुन देणार असा मोठा प्रश्न हॉटेल चालकांना पडला आहे.

गोंदिया येथे प्रदेश काँग्रेसचे सचिव अमर वराडे,नगराध्यक्ष सचिन शेंडे, बाजार समितीचे उपसभापती राजकुमार पटले,विशाल अग्रवाल,अमित्त मानकर,कृष्ण कुमार लिल्हारे,मनोज पटनायक,चंद्रकुमार चुटे,हरिश तुळसकर,आलोक मोहंती,आशा जैन,लोकेश रहागंडाले,अशोक गुप्ता,विनोद जैन,शहर अध्यक्ष अशोक चौधऱी,शीतल शरणागत,रुपाली उईके आदी उपस्थित होते.तिरोडा येथे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनसोड यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.यावेळी राधेलाल पटले,वाय.टी.कटरे,ओम पटले आदी उपस्थित होते.सडक अर्जुनी येथे सरपंच गंगाधर परशुरामकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.blank

देवरी येथे कुलदिपजी गुप्ता, राजकुमार पुराम, जिवन सलामे, सुनंदाताई बहेकार, उषाताई शहारे, राधिकाताई धमगुडे, भारतीताई सलामे, अनुसयाताई सलामे, सुनिताताई शाहु, रंजित कासम, सावंतबापु राऊत, प्रदिपकुमार देशमुख, राजेश चांदेवार, ओमप्रकाश रामटेके, मोतीलाल पिहदे, प्रल्हाद सलामे, अविनाश टेंभरे, सकिल कुरेशी, शंकी भाटिया नगरसेवक मोहन डोंगरे नगरसेवक, नितीन मेश्राम उत्तम साखरे सचिव गोंदिया जिल्हा कॉग्रेस, मानिकबापु आचले, रामेश्वर बहेकार, देवेंद्र पवार, पंकज पवार, सुरेंद्र बन्सोड, रुपेश राऊत, योगेश साखरे, अमित तरजुले, संजय कोरे, परसराम गोविंद वैद्य तसेच इतर शिष्टमंडळ हजर होते.