भाजपला मतदान करु नका – मराठा मूक मोर्चाच्या बैठकीत निर्णय

0
4

औरंगाबाद – आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा समाजाला झुलवत ठेवणा-या भाजपला जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय मराठा मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. लाखोंचे मोर्चे काढूनही सरकारनं आरक्षणाच्या मुद्याकडं गांभीर्यानं पाहिलं नाही. उलट भाजप सरकारनं मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रतत्न केला आहे. त्यामुळे उद्या होणा-या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत भाजपला मतदान करु नका असा ठराव औरंगाबादमध्ये पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.
मराठा समाजातील मतदारांनी भाजपला मतदान करु नये इतर कुठल्याही पक्षाला मतदान करावे असे आवाहनही या बैठकीत मराठा समाजबांधवांना केले आहे. या निर्णयामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासह काही जिल्हा परिषदांमध्य आणि पंचायत समितीमध्ये उद्या मतदान आहे. तर उरलेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि 10 महापालिकेची निवडणुक 21 फेब्रुवारीला आहे.