भुसेंच्या राजीनाम्यामुळे शिवसेना मंत्र्यांमध्ये चलबिचल

0
11

मुंबई – मुंबई पालिका निकालांचे धक्के आता राज्याच्या राजकारणाला बसण्याची शक्‍यता निर्माण झाली असुन त्यामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याच्या शक्‍येतेला बळ मिळत आहे. शिवसैनिकांचा प्रचंड दबाव आणि पक्षप्रमुखांच्या इच्छेमुळे शिवसेना मुंबई पालिकेची सत्ता मिळवण्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या कॉंग्रेसची मदत घेण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यामुळे राज्य सरकारवरही या घडामोडीचा प्रतिकुल परिणाम होण्याची शक्‍यता असुन सरकारमधुन बाहेर पडल्यास महतप्रयासाने मिळालेली मंत्रीपदे जाण्याच्या भीतीने सेना मंत्र्यांची धाकधूक वाढली असल्याचे समजते.
मालेगाव तालुक्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील पक्षाच्या अपयशामुळे आज ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला मंत्रीपदाचा राजीनामा सोपवला. या राजीनाम्यामुळे इतर मंत्र्यांची मात्र कुचंबणा झाली आहे. पक्षाची प्रगती हा मुद्दा घेतल्यास गोरेगावमधील ढळढळीत अपयशामुळे ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई, मराठवाड्यातील हिंगोली सारख्या जिल्हा परिषदा गमावल्याने दिवाकर रावते, विदर्भाची जबाबदारी असणारे डॉ. दिपक सावंत यांची भुसेंच्या नैतिक जबाबदारीच्या जाणीवेमुळे मोठी कुचंबणा झाली आहे