हिंदी चित्रपट ‘कट्टे… दी रेविंज’ चे आॅडिशन

0
23

७० टक्के चित्रीकरण गोंदिया जिल्ह्यात, दिग्गज अभिनेते करणार भुमिका
गोंदिया- मॉ क्रिटीव्ह फिल्म व एस.पी. फिल्मसव्दारा निर्मित कट्टे या आगामी चित्रपटाची ७० टक्के शुटींग गोंदिया जिल्ह्यातील विविध भागात होणार आहे. तेव्हा या चित्रपटाचे आॅडिशन २६ फेब्रुवारी रोजी येथील शासकिय विश्रामगहात सकाळी १० वाजतापासून सुरू होणार असल्याचे माहिती चित्रपटाचे निर्देशक कबीर दा यांनी दिली.
कट्टे या आगामी चित्रपचटाच्या चित्रीकरणासाठी विविध स्थळाची पाहणी करण्यासाठी चित्रपट निर्माता सुधीर गौतम,आशिफ खान व निर्देशक कबीर दा हे गोंदियात आले असून चित्रीकरणासाठी जिल्ह्यातील हॉजराफॉल,
कचारगढ,नहेगावबंध,नगझिरा अन्य ठिकाणांची पाहणी त्यांनी यावेळी त्यांनी केली. कट्टे या चित्रपटाची ७० टक्के चित्रीकरण गोंदिया जिल्ह्यात होणार असून येथील स्थानिक कलावंतांना या चित्रपटात काम करण्याची संधी या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना मिळणार आहे. या चित्रपटात शक्ती कपूर, रजा मुराद,ग्रेसी सिंग महत्वाच्या भुमिका करणार आहेत. तर चित्रपटात सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर व जलेबीबाई फेम रूतुजा पाठक हे गीत गाणार आहेत. तेव्हा गोंदियात शहरात आोयोजित आॅडीशन जिल्ह्यातील कलावंतानी १२ ते ४५ वयोगटातील कलावंतांनी हजेरी लावण्याचे आवाहन सहनिर्माता अमित पटले व शशीकला पटले यांनी प्रसिद्धपत्रकातून केले आहे.
जे मुंबर्ईत नाही ते गोंदियात
गोंदिया जिल्हा हा नैसगिक वनसंपदेनी नटलेला असून हॉजराफॉल,बोलदकसा, बिरशी एअरपोर्ट,कचारगढ व अन्य ठिकाण पर्यटकांना भुरळ पाळत असतात. पर्यटनाच्यादृष्टीने गोंदिया जिल्ह्याची ख्याती मुंबईतही आहे. मुंबईत जे चित्रीकरणाचे स्पॉट आहेत. ते कुत्रिमरित्या तयार करण्यात आले आहेत. तर गोंदियातील स्पॉट हे नैसर्गिकरित्या तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे आमच्या आगामी कट्टे ह्या चित्रपटाचे ७० टक्के चित्रीकरण गोंदिया जिल्ह्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.- कबीर दा,दिग्दर्शक