अर्जुनी मोरगाव येथे भाजपा स्थापना दिवस

0
20

अर्जुनी मोरगाव ,दि.९:: स्थानिक भाजपा जनसंपर्क कार्यालयात भाजपा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.सर्वप्रथम भारतमाता व पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून भाजपा तालुका अध्यक्ष उमाकांत ढेंगे यांच्या हस्ते पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उमाकांत ढेंगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतीय जनता पक्षाची स्थापना पंडित दीनदयाल उपाध्याय व त्यांच्या सहकार्‍यांनी केली. अनेक संघर्षानंतर हा पक्ष सध्या देशात नंबर एकवर पोहोचला आहे. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतच्या शेवटच्या घटकातील कार्यकर्त्यांमुळेच पक्ष बळकट झाल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला जि.प. उपाध्यक्ष रचनाताई गहाणे, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते रघुनाथ लांजेवार, केवळराम पुस्तोळे, भोजराम लोगडे, विनोद नाकाडे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संदीप कापगते, जि. प. सदस्य मंदाताई कुंभरे, डॉ. नाजूक कुंभरे, कृउबास संचालक कुंदाबाई डोंगरवार, डॉ. गजानन डोंगरवार, कृउबास सभापती कॉशिम जमा कुरेशी, उपसभापती लायकराम भेंडारकर, संचालक व्यंकट खोब्रागडे, नगरसेवक मुकेश जायस्वाल, माणिक मसराम, गीताबाई ब्राम्हणकर, शीतल लाडे, रचना वकेकार, अर्चना झेलकर, होमराज पुस्तोळे, नूतन सोनवाने, पुरुषोत्तम डोये, तामदेव कापगते, खुशाल तवाडे, संजय जांभुळकर, चुन्नीलाल लोणारे, युवराज झोळे, दिलीप हुकरे, संजय भोयर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक लायकराम भेंडारकर यांनी केले. संचालन संजय जांभुळकर यांनी तर आभार नूतन सोनवाने यांनी मानले.