सदाभाऊ खाेत यांचा सरकारकडून बुजगावण्यासारखा वापर; अामदार बच्चू कडू यांची टीका

0
18
मुंबई,दि.६ : –‘शेतकरी संपाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. फडणवीस सरकारला हा मोठा इशारा आहे. मुख्यमंत्र्यांनी या संपात अनेक खेळी केल्या. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचा फारसा उपयोग होत नाही, हे लक्षात येताच त्यांनी शेतकरी नेते असलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा बुजगावण्यासारखा वापर केला’, अशी टीका विदर्भातील अपक्ष आमदार व प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी केली.
‘आंदोलनात फूट पाडण्याचा सरकारकडून प्रयत्न झाला असला तरी शेतकरी आजही आक्रमक आहेत. सोमवारी राज्यभर पाळण्यात आलेल्या बंदवरून शेतकऱ्यांची ताकद सरकारला िदसून आली असेल. संप जाहीर झाल्यापासून शेतकरी नेते राहिलेले खाेत राज्य सरकारकडून बोलत होते अाणि मुख्यमंत्री सांगत असल्याप्रमाणे खोतरूपी बुजगावणे हलत होते.’, असे कडू म्हणाले.
केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शेतकरी जीन्स् घालून आंदोलन करत असल्याची टीका केली होती. त्यावर ‘शेतकऱ्यांनी जीन्स पँट नव्हे तर काय चड्डीवर आंदोलन करायचं का?’ असा सवाल करतानाच ‘आम्ही जर शेतीच केली नाही तर तुम्हाला घालायला चड्डीही राहणार नाही’, असेही कडू यांनी बजावले.