तामलवाडी येथे राज्याभिषेक जल्लोषात साजरा

0
11

तुळजापूर,दि.06 -तालुक्यातील  तामलवाडी  येथे शिवरत्न प्रतिष्ठान यांच्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
हिंदवी स्वराज्य संस्थापक, मराठी मनाचा स्वाभिमान जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त शिवरत्न नगर तामलवाडी येथे शिवरत्न प्रतिष्ठान च्या वतीने राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. सकाळी 6 . 30 वाजता राजेंच्या मुर्तीस दुग्धाभिषेक व तुळजापूर येथुन आणलेल्या पवित्र पाण्याने अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शिवरत्न नगर येथील प्रत्येक घरामध्ये जाऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच ज्ञानेश्वर माळी, चेअरमन शिवदास पाटील, मुकुंद गायकवाड, पांडुरंग लोंढे, अनिल पाटील , महादेव मसुते , अध्यक्ष सर्जेराव गायकवाड, इंद्रजित घोटकर , अशोक पाटील, समाधान गायकवाड, ज्ञानेश्वर जगताप, नागेश घोटकर , गोपाळ पाटील, निरंजन करंडे, विठ्ठल नेटके, नागेश शिंदे, सचिन शिंदे, सुरज गायकवाड, मारूती गायकवाड, हरी लोंढे , महादेव माळी टेलर, विकास कांबळे, जगन्नाथ गायकवाड, हरी गाटे , बालाजी घोटकर, नागनाथ मसुते, लहुजी गायकवाड, चेतन पाटील, मोरेश्वर कुलकर्णी, इत्यादी मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.