शिक्षणमंत्री आणि कुलगुरुंनी राजीनामा द्यावा, आदित्य ठाकरेंची मागणी

0
9

मुंबई, दि. 24 – मुंबई विद्यापीठातील भोंगळ कारभारावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कुलगुरु आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कुलगुरूंना विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवता येत नसतील तर त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबई विद्यापीठातील गोंधळाबाबत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचीही भेट घेतली आहे. कुलगुरु आणि शिक्षणमंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागत आहे, याला कुलगुरु संजय देशमुख आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे जबाबदार आहेत, त्यामुळे त्या दोघांचे राजीनामे घ्यावे अशी मागणी आदित्य ठाकरेंनी राज्यपालांकडे केली.