शेतकर्यांच्या वेदनेवर मीठ चोळू नका-आ.वड्डेटीवार

0
9

भंडारा,दि.16 : आॅनलाईन कर्जमाफीचा अर्ज दाखल करताना एक ते दीड तास लागतात. एकीकडे खर्या शेतकर्यांना कर्ज माफी देऊ असे बोलत असले तरी दुसरीकडे बोगस शेतकरी समोर येतील अशी टिंगल उडवून शेतकºयांच्या वेदनांवर मीठ चोळण्याचे काम भाजपचे सरकार करीत आहे. दुष्काळ असतानाही बळीराजाची ही पिळवणूक कदापी खपवून घेतली जाणार नाही, असा कळकळीचा इशाराही आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला. पत्रपरिषदेला माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, प्रदेश सचिव मुजीब पठाण, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, माजी नगराध्यक्ष बशीर पटेल, डॉ. अजय तुमसरे, सिमा भुरे, जि.प. सदस्य प्रेम वनवे, निलकंठ कायते, प्यारेलाल वाघमारे, महेंद्र निंबार्ते, प्रशांत देशकर आदी उपस्थित होते.
भंडारा येथे शुक्रवारी काँग्रेस पक्षातर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार वडेट्टीवार म्हणाले, सरकारने आॅनलाईन कर्जमाफीची मुदत वाढविली असली तरी अनेक तांत्रीक कारणांमुळे अर्ज सबमिट व्हायला वेळ लागत आहे. कर्जमाफी द्यायची भाजप सरकारची नियत नाही. ना. चंद्रकांत पाटील यांनी, राज्यात दहा लक्ष शेतकरी बोगस असल्याचे सांगून शेतकर्यांची थट्टा केली आहे. बोगस शेतकरी असतील तर त्यांची खुशालपणे यादी जाहिर करावी, आम्ही त्याची सहानिशा करु. परंतु असे बोलून सरकारच्या नियतीसोबतच शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळू नये असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला.
जिल्ह्यातील महत्वपूर्ण रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. दुसरीकडे भारनियमनाचा बडगा जनसामान्यांसह लघु उद्योगांचे कंबरडे मोडत आहे. अपुरा पाऊस असतांना व कोळशाची उपलब्धता पुरेशा प्रमाणात नसताना सरप्लस वीज देण्याची घोषणा कोणत्या आधारावर करण्यात आली, हाही एक संशोधनाचा विषय आहे. वीज बिल भरमसाठ पाठवित असताना व कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित होत असताना ऊर्जा मंत्र्यांच्या क्षेत्रात ज्या प्रमाणे २४ तास वीज पुरवठा केला जात आहे. तसाच पुरवठा येथील शेतकºयांच्या कृषी पंपानाही मिळाला पाहिजे.नागपूरातील नाग नदीच्या दुषीत पाण्यामुळे वैनगंगेचे पवित्र पाणी फार दुषीत झाले आहे. कोट्यवधींची घोषणा करणाºया मंत्र्यांनी नाग नदीच्या स्वच्छतेबाबत व जलशुध्दीकरणाबाबत का बोलत नाही असा टोलाही आमदार वडेट्टीवार यांनी लगावला.
भाजपचेच खासदार सत्तेत असताना विरोधी सुर काढीत आहे. घरात असताना राजकारणात कबड्डी, खो-खो व लंगडी खेळ सुरु आहे काय? याचे उत्तर येणाºया काळात पहायला मिळणार आहे. काँग्रेस पक्षात येणाºया प्रत्येकाचेच आम्ही नेहमी स्वागत केले आहे. हीच काँग्रेसची परंपरा व संस्कृती आहे. खा. नाना पटोले काँग्रेसमध्ये यायला इच्छूक असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करु, असेही बोलायला वडेट्टीवार विसरले नाही.