लोकअदालतीच्या माहितीसाठी पथनाट्य़ाद्वारे जनजागृती

0
7
लाखनी,दि.16: येथील न्यायालय परिसरात महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी लोकअदालतीचा लाभ जास्तीत जास्त घ्यावा या उद्देशाने लोकअदालत म्हणजे काय असते याविषयी जाणीव जागृती व प्रसार प्रचार करण्याच्या उद्देशाने लाखनी न्यायालय परिसरात पथनाट्याद्वारे जाणीव जागृती केली. यावेळी प्रमुख न्यायाधीश ए. डी. मारगोडे सहदिवानी न्यायाधीश प्रियांका पमनानी प्रामुख्याने उपस्थित होते.
      यावेळी पथनाट्य चमुने पती पत्नी मधील वाद आपसी समजोत्या द्वारे कसे मिटविता येतील व गुण्यागोंदयाने  कसे नांदता येईल याचे सुंदर चित्रण उभे केले. यावेळी समर्थ विद्यालयातील दिप्ती बांडेबूचे, पूर्वा दरवडे, इशा पटले , समीक्षा कोसरे, शरयू भलावी, पूर्वा लांडगे, त्रिवेणी बडगे, ओजल टेंभूणे या वर्ग १० च्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यावेळी भेटवस्तू देऊन विद्यार्थिनींना गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थिनींना मार्गदर्शन अक्षय मासुरकर
 आशा फरांडे , कु. वर्षा नानोटकर कु. मिनाक्षी कळ्याम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड.भारत गभने यांनी तर आभार अँड. प्रशांत गणवीर यांनी मानले.