भाजपाच्या राज्यात भाजपाचेच आंदोलन!

0
14

अहमदनगर,दि.06: शहरातील वाढत्या भारनियनाविरोधात  सत्ताधारी भाजपावरही आंदोलनाची वेळ आली. भारनियमनच्या चुकीच्या वेळेमुळे पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाला असून याबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात, तसेच शहरातील भारनियमन त्वरित रद्द करावे, अशी मागणी भाजपा पदाधिका-यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांच्याकडे केली. उपमहापौर श्रीपाद छिंदम, गटनेते सुवेंद्र गांधी, शहर जिल्हा उपाध्यक्ष किशोर डागवाले, मध्यनगर अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजपाने शुक्रवारी सकाळी महावितरण कार्यालयात अभियंता बोरसे यांना निवेदन दिले. सत्ताधारी पक्षाचे असल्याने इतर पक्षांसारखे आंदोलन करून अधिका-यांना धमक्या देणार नाही. मात्र, जनतेच्या भावना आणि मागण्या आम्हाला मांडाव्याच लागतील, अशी भूमिकाही भाजप पदाधिका-यांनी घेतली. यावेळी भाजपाचे प्रशांत मुथा, सागर गोरे, रोहन डागवाले, मंगेश निसळ, मिलिंद भालसिंग, राहुल रासकर, भरत ठुबे, नितीन जोशी, आलीस सय्यद, अविनाश सकला, अभिषेक दायमा, सागर कारले, अज्जू शेख, संदीप ढाकणे, सजित खरमाळे, रोषण गांधी, नरेश चव्हाण उपस्थित होते.