सरकारच्या विरोधात जनआक्रोश मोर्च्याचे आयोजन-माणिकराव ठाकरे

0
6

बुलढाणा,दि.03 : संपूर्ण राज्यात सरकारच्या धोरणा विरोधात जनतेमध्ये आक्रोश असल्याने सरकारचे दोष दाखविण्यासाठी कोंग्रेस पुढे सरसावली असून राज्यातील प्रत्येक विभागात 1 ते 8 नोव्हेंबर दरम्यान जनआक्रोश मोर्च्याचे आयोजन केले आहे. त्या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती येथे पत्रकारांशी चर्चा करतांना काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.या पत्रकार परिषदेला कोंग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोन्द्रे, शाम उमाळकर, दिलीपकुमार सानंदा, लक्ष्मण घुमरे, जिल्हा परिषद सदस्य जयश्री शेळके उपस्थित होते.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ति, जीएसटी, शेतमालाला योग्य भाव, कीटक फवारणी शेतकऱ्यांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या कंपन्या विरोधात गुन्हे दाखल करणे, वाढलेली महागाई, गॅसचे दर, मागासवर्गियांच्या योजना बंद करण्याविरोधात जनआक्रोश मोर्च्याच्या माध्यमातून सरकारची पोलखोल करण्यात येणार असून अमरावतीपासून सुरु होणार्या या आक्रोश मोर्चाचे समापन सांगली येथे होणार असल्याची माहिती माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.