मुख्यमंत्री ‘फडणवीस’ की ‘चंद्रकांतदादा’ हेच कळत नाही : खा.पटोलेंचा टोला

0
15

कोल्हापूर ,दि.६ :  ‘भाजपा सरकार आंधळे आणि बहिरे आहे. त्यामुळं सरकारच्या चुकीच्या भूमिकेविरोधात मी नेहमीच प्रश्न मांडतो. पक्षाने काय कारवाई करायची ती करु दे.’ असे म्हणत भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे.खा.पटोले हे आज (सोमवार) कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी  होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कर्जमाफीच्यावेळी रोज नवीन आदेश निघत होते. यामध्ये एक आदेश महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढल्यावर दुसरा आदेश मुख्यमंत्री फडणवीस काढला. त्याचबरोबर नारायण राणेंसह प्रत्येकाला मंत्री करणार म्हणून दररोज चंद्रकांतदादा सांगत आहेत. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की चंद्रकांतदादा हेच कळत नाही, असा टोला भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत हाणला. सरकारकडून जनतेची अपेक्षापूर्ती न होता नोटा बंदीतून काळा पैसा बाहेर आलाच नाही असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

शेतकरी आणि महिलांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत आणि गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांनी लगाम घालावा. असा सल्लाही पटोले यांनी दिला आहे.शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. असे म्हणत सरकारचे कर्जमाफीचं काम बरोबर नसल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.‘भाजपा सरकार आंधळे आणि बहिरे आहे. त्यामुळे सरकारच्या चुकीच्या भूमिकेविरोधात मी नेहमीच बोलणार. पक्षाने कारवाई केली तर करू देत.’ असं थेट टीका यावेळी पटोलेंनी केली.नोटबंदी व जीएसटीमुळे देशाचे नुकसान झाले आहे.नोटाबंदीनंतर जमा होणारे काळा पैसा, नकली नोटा कुठे आहेत?,नोटाबंदीत रांगेत उभारणारी ३०० नागरिक मरण पावले. नोटाबंदी व जीएसटी अंमलबजावणीवर आम्ही टीका केल्यानंतर केंद्र सरकार जीएसटीच्या दरात सुधारणा करत आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयावर आपल्यासह यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, अरुण शौरी टीका करत आहेत. भाजपच्या संविधानातही लोकप्रतिनिधींची जी कर्तव्येआहेत त्यानुसार आम्ही सरकारच्या चुकांकडे लक्ष वेधत आहोते, असे पटोेले यांनी सांगितले.