25.2 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home राजकीय विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी माजी आमदार दिलीप माने काँग्रेसचे उमेदवार

विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी माजी आमदार दिलीप माने काँग्रेसचे उमेदवार

0
32

मुंबई,दि.26ः- विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. माने हे सोलापूरचे माजी आमदार आहेत ते उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत.माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपला संयुक्त उमेदवार उभे करणार आहेत. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.येत्या 7 डिसेंबर रोजी या जागेसाठी निवडणुक होणार आहे. काँग्रेस सोडल्यामुळे राणेंना या जागेचा राजीनामा द्यावा लागला होता. या जागेसाठी 29 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. विधान परिषदेच्या या जागेवर विजय मिळविण्यासाठी 145 आमदारांच्या समर्थनाची गरज आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे 81 आमदार आहेत.