एकोडी रुग्णालयात सविंधान दिनानिमित्त रुग्णांना फळवितरण

0
9

गोंदिया,दि.२६ः – भारतीय संविधान दिना निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी येथे भरती असलेल्या रुग्णांना महात्मा गांधी तंटामुक्त जिल्हा संघटना गोंदिया तर्फे फळ वितरण करण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेशकुमार तायवाडे यांनी भारतीय संविधान विषयी माहिती देताना म्हणाले की २६ नोव्हेंबरला भारतीय संविधान दिनभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सुपुर्द केले.त्यांनी हे संविधान जनतेच्या वतीने स्वीकृत करून अंगीकृत्त केले.भारतीय संविधान हा या देशाचा मुलभूत कायदा आहे.देशाचा कारभार या नुसारच चालतो.किंवा चालविला पाहिजे असे शासन,प्रशासन व न्यायसंस्था यांच्यावर बंधन आहे. संविधानाचा अपमान करण्याचा कोणालाच अधिकार नाही.संविधानाच्या माध्यमातून भारत देश कसा घडवायचा हे संविधानाची प्रस्तावना याला आम्ही उद्देशीका म्हणतो त्यात स्पष्ट केले आहे.भारतीय संविधान सभेने ९ डिसेंबर १९४६ ते २६ नोव्हेंबर १९४९ पर्यंत​ म्हणजे २ वर्षें ११ महिने व १७ दिवस कामकाज करुन संविधानाची निर्मिती केली. या संविधान निर्माण प्रक्रियेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची अंत्यत मोलाची कामगिरी आहे असे त्यांनी सांगितले.या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.जी अग्रवाल, उपाध्यक्ष​ मुमताज अल्ली सैय्यद,सचिव श्रावण बरियेकर,कार्याध्यक्ष विनोद बरेकर,सहसचिव पंकज मेश्राम,छगन बिरणवार, विष्णूदयाल बिसेन,चुन्नीलाल बिसेन,आरोग्य सेविका चिंचरवाड,परिचर रहांगडाले उपस्थित होते.कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम केले.

चंद्रपूरः- जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतिने सविंधान दिनानिमित्त महामानव डॉ बाबासाहेब आबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सविंधानाचे वाचन करण्यात आले. यावेळी काँग्रेस विधिमंडळाचे उपगटनेचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्धस नंदू नगरकर , युवक अध्यक्ष शिवा राव, नगरसेवक कारीमभाई व कॉंग्रेस पद्धधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.