स्वत:च्या सरकारविरोधात यशवंत सिन्हांची आरपारची लढाई

0
9

अकोला,दि.५-ङ्कनिवेदन, अर्ज देण्याची वेळ संपली असून, आता आर-पारची लढाईची वेळ आली आहेङ्क, असे म्हणत माजी अर्थमंत्री व भाजपचे जेष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी स्वत:च्याच सरकारविरोधात आंदोलनाचे बिगुल फुंकले आहे. अकोल्यात शेतकèयांच्या मागण्यांसाठी यशंवत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. या मागण्यांसंदर्भात आज मंगळवारी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्टड्ढवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यामुळे भाजपला घेरण्यासाठी यशवंत सिन्हा कामाला लागले आहेत.
दुसरीकडे विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्यांनी विचलित होणारे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे सरकारवर ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची भाषा करत होते. तेच फडणविस आता मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढे कसे बदलले. शेतकèयांच्या छोट्या मागण्याही मान्य न करणारे फडणवीस आता शेतकèयांच्या आत्महत्यांची वाट पाहत आहेत का, असा घणाघाती प्रश्न भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी मंगळवारी अकोला येथे केला.
शेतकèयांच्या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित आंदोलनाचा भाग म्हणून माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेतकक्तयांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. प्रशासनासोबतची बोलणी फिसकटल्याने निर्धारावर ठाम असलेल्या यशवंत सिन्हा, रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो शेतकèयांना पोलिसांनी स्थानबद्ध करून पोलिस मुख्यालयात आणले. रात्रभर या ठिकाणी ठाण मांडून बसलेले यशवंत सिन्हा व शेतकक्तयांचे आंदोलन मंगळवारी दुसèया दिवशीही सुरुच आहे. या आंदोलन स्थळाला नाना पटोले यांनी दुपारच्या सुमारास भेट देऊन शेतकèयांना संबोधित केले.राज्य सरकारने शेतकèयांच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल. यासाठी देशपातळीवरील नेत्यांच्या संपर्कात असून भाजपचे खासदार वरूण गांधी व माजी मंत्री अरुण शौरी यांनी या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
शेतमाल खरेदीच्या मुद्यावरुन प्रशासन व शेतकèयांमधील बोलणी फिस्कटल्यावर शेतकèयांनी यशंवत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा बिगुल फुंकला. तेव्हा जिल्हाधिकाèयांनी सिन्हा यांना मुख्यमंत्र्यांच्या सचिवांशी बोलण्याची विनंती केली होती. मात्र सिन्हा यांनी ङ्कमी मुख्यमंत्र्याशीच बोलणारङ्क, असे स्पष्ट केले. त्यांनतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करणाèया सिन्हा व शेतकèयांना पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी ताब्यात घेतले होते. तेव्हा ङ्कजनावरे समजले काय?, पोलिस मुख्यालयाला आग लावूङ्क, अशा शब्दात सिन्हा यांनी इशारा दिला होता.