युती सरकारविरोधात काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन

0
15

मुंबई – काँग्रेस पक्ष राज्यातील सेना-भाजपाच्या युती सरकारविरोधात आक्रमक झाला असून जनतेच्या विविध प्रश्नांसाठी आज राज्यभरात रास्ता रोको करण्यात येत आहे.

निव्वळ घोषणाबाज असे हे सरकार असून या सरकारने निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने पाळण्याचे टाळले आहे. घुमजाव करण्याशिवाय सरकारने १०० दिवसांत काहीही केलेले नाही. मुंबईतील महत्त्वाची कार्यालये गुजरातला हलवण्याचा घात घातला जात असल्यामुळे या सरकारचा मुखवटा फाडण्यासाठी आम्ही आंदोलन छेडले असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.

या सरकारने शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसल्याने शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. विदर्भात शेतकरी आत्महत्या करत आहेत. यामुळे लोकांमध्ये सरकारविरोधात प्रचंड असंतोष खदखदत आहे, तो आमच्या आंदोलनात दिसून येईल, असे ते म्हणाले.