पवारांची ओबीसी विरोधी भूमिका ; अँड. भेंडारकर व मुनघांटेचा राष्ट्रवादीला रामराम

0
8

चंद्रपूर,दि.25 :राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वेगळ्या विदर्भाबद्दल आणि ओबीसी आरक्षणाबद्दल घेतलेल्या भूमिकेचा निषेध नोंदवित येथील राष्ट्रवादीचे नेते व प्रदेश प्रतिनिधी अँड. गोविंद भेंडारकर तसेच गडचिरोली येथील राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुनघाटे यांनी शरद पवार यांच्या विदर्भ व ओबीसी विरोधी भूमिकेमुळे पक्षाचा राजीनामा देत असल्याची घोषणा नागपुरात केली. अँड. भेंडारकर हे १३ वर्षांपासून राष्ट्रवादीत सक्रिय आहेत. ब्रह्मपुरी, चिमूर विधानसभा अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष या पदावर त्यांनी काम केले असून २0१४ मध्ये त्यांनी चिमूर विधानसभेची निवडणूक लढविली होती. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीचे ते सदस्य आहेत. या वेळी अँड. भेंडारकर म्हणाले, जनतेला विदर्भ हवा आहे. मात्र, शरद पवार यांनी भाषेवरून विदर्भात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पवार विदर्भात येतात तेव्हा सोयीस्कर बोलतात. तिकडे गेले की बदलतात. विदभार्तील आत्महत्या, नक्षलवाद, बेरोजगारी या विषयांवर ते का बोलत नाहीत, असा सवालही त्यांनी केला. मुनघाटे यांनीही पवारांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका केली.