भाजपा प्रदेश कार्यालयमंत्रीपदी मुकुंद कुलकर्णी यांची नियुक्ती

0
10

मुंबई-भारतीय जनता पार्टीच्या मुंबईतील महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या सचिवपदी मुकुंद नारायण कुलकर्णी यांची मंगळवारी नियुक्ती करण्यात आली.
भाजपा प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी यांनी ही नियुक्ती केली. मुकुंद नारायण कुलकर्णी यांनी यापूर्वी १९९२ ते २००२ या कालावधीत भाजपाच्या प्रदेश कार्यालयमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. सध्या ते सहसचिवपदी कार्यरत होते.
मावळते कार्यालयमंत्री मुकुंदराव कुळकर्णी यांनी ऑगस्ट २००२ ते फेब्रुवारी २०१५ या कालावधीत पदाची जबाबदारी सांभाळली. प्रकृतीच्या कारणास्तव आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मुकुंदराव कुळकर्णी यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीशजी, रविंद्र भुसारी व प्रदेश सहसंघटनमंत्री सुनील कर्जतकर यांना केली होती. त्यानुसार बदल करण्यात आला.
मुकुंदराव कुळकर्णी यांना लवकरच अन्य महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, असे रवींद्र भुसारी यांनी सांगितले.