राहुल गांधी १३ जूनला नागभिड तालुक्यातील नांदेड येथे

0
8

चंद्रपूर,दि.११: काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी बुधवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत‍ असून, नागभिड तालुक्यातील नांदेड येथील दिवंगत दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करुन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.’एचएमटी’ या धानाच्या लोकप्रिय वाणाचे जनक दादाजी खोब्रागडे यांचे ३ जून रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते नांदेड येथील रहिवासी होते. त्यांच्या निधनाची बातमी माहित होताच खा.राहुल गांधी यांनी नांदेड येथे जाऊन खोब्रागडे कुटुंबीयांची भेट घेण्याचा मानस व्यक्त केला.

त्यानुसार, बुधवारी सकाळी साडेदहा वाजता खा.राहुल गांधी यांचे नांदेड येथे आगमन होईल. सुरुवातीला ते दिवंगत दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करुन त्यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतील. या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, सामान्य नागरिक, तसेच काँग्रेस, युवक काँग्रेस व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवक काँग्रेसचे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे.