हे तर ठगांचे सरकार ! – यशवंत सिन्हा

0
10

अकोला,दि.23 : शेतकºयांच्या न्याय मागण्यासाठीचे लेखी आश्वसान देऊनही पूर्ण न करणाºया राज्य शासनाने शेतकºयांचा विश्वासघात केला असून, यावरू नच हे सरकार ठगांचे असल्याची टिका माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा केली.त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरू च ठेवणार असल्याचा इशारा मंगळवारी दिला.

शेतकरी जागर मंचाच्यावतीने अकोल्यात मंगळवार, २३ आॅक्टोबर रोजी दुसºया ‘कासोधा’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला संबोधित करताना सिन्हा बोलत होते.परिषदेच्या अध्यक्षस्थानी महिला शेतकरी टिना देशमुख होत्या. व्यासपिठावर खासदार शत्रुघ्न सिन्हा,आप पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंग, समाजवादी पक्षाचे राष्टÑीय प्रवक्ते घनश्याम तिवारी,गुजराजचे माजीमंत्री प्रविणभाई जडेजा, प्रिति मेनन,स्वराज्य सेनेच अब्दूल फारू ख यांची प्रमुख उपस्थिती होती.
सिन्हा पुढे बोलताना म्हणाले की, सार्वजनिक जिवनात थापडे, ठंगाशी गाठ पडेल असे वाटले नव्हते,ज्या मागण्या सहज मान्य करण्या सारख्या असताना त्या मागण्यांची पूर्तता लेखी आश्वासन देऊन करता येत नसेल तर हे सरकार शेतकºयांच्या हिताचे नाही हे समजून घेतले पाहिजे.आमचा संघर्ष हा तोडण्यासाठी नव्हे तर जोडण्यासाठी असल्याची टिका त्यांनी सरकारवर केली. अकोल्यात उभी ठाकलेली ही ताकद आता अकोल्यापर्यंत मर्यादित नसून संपूर्ण देशात शेतकरी लढा उभा करणार असल्याची घोषणा त्यांनी येथे केली.या लढयात आपण एकटे नाहीत तर संपूर्ण देश उभा असल्याचे व्यासपिठावरील देशातील नेत्यांच्या उपस्थितीने हे दर्शविले असल्याचा विश्वास त्यांनी शेतकºयांना दिला.