26.9 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home राजकीय जे नको ते मतदारांनी नाकारले; मतदारांचे अभिनंदन ! – उद्धव ठाकरे

जे नको ते मतदारांनी नाकारले; मतदारांचे अभिनंदन ! – उद्धव ठाकरे

0
41

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ),दि.12 –  “पर्याय कोण ? या फालतू प्रश्नात गुंतून न पडता चार राज्यातील मतदारांनी जे धाडस दाखवले त्यांच्या बेडरपणाचे मी अभिनंदन करतो, ” अशा प्रखर शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
चार राज्यातील निवडणूक निकालांवर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण निकालानंतर आपले मत मांडले. “निवडणुकीत हार – जीत तर होतेच. जिंकतो त्याचे अभिनंदन होतच असते. पण चार राज्यात परिवर्तन घडवणाऱ्या निर्भय मतदारांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी ते ईव्हीएम, पैसेवाटप, गुंडागर्दी आणि त्याही पेक्षा पर्याय कोण ? या फालतू प्रश्नात गुंतून न पडता जे नको त्यांना आधी नाकारले, उखडून फेकले. पुढचे पुढे काय ते बघू. हेच खरे धाडस आहे. मतदारांच्या धाडसाने देशाला दाखविलेली ही दिशा आहे.  त्या सर्व मतदारांचे मी मनापासून अभिनंदन करतो,” असे शेवटी उद्धव ठाकरे म्हणाले.

blank