24.3 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home राजकीय साकोली विधानसभा मतदारसंघातील बुथप्रमुखांचा आढावा

साकोली विधानसभा मतदारसंघातील बुथप्रमुखांचा आढावा

0
34

साकोली,दि.०५-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील साकोली विधानसभा मतदारसंघातंर्गत येत असलेल्या साकोली,लाखनी व लाखांदूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व बुथ समिती पदाधिकारी यांची बैठक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचे निर्देश माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिले.ते आज ५ फेबुवारीला साकोली येथे आयोजित मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व बुथप्रमुखांच्या आढावा बैठकीत बोलत होते.राष्ट्रवादी काँग्रसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या निर्देशानुसार माजी आमदार जैन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.बैठकीला भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनीलभाऊ फुंडे,अविनाश ब्राम्हणकार,देवेन्द्र चौबे,देविदास राऊत,दिपक चिमनकर,जया भुरे,मायाताई अंबुले,मदन रामटेके,प्रभाकर सपाटे,बालू चुंने,अंगराज समरीत,डॉ.विकास गभने,प्रदीप मासुरकर,शैलेश गजभिये,सुरेश बघेल,धन्नू व्यास,नागेश वाघाये,लता दुरूगकर,रवी राऊत,प्रवीण भांडारकर,निलेश घरडे,अनिल टेंभरे आदीं उपस्थित होते.